मुंबई : शरद पवार यांना भीमा- कोरेगाव प्रकरणी आयोगाचे समन्स

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भीमा कोरेगाव आयोगाने साक्ष नोंदवण्यासाठी देण्यासाठी ७ मे ची समन्स बाजावली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाी पवार यांना सरकारच्या चौकशी आयोगासमोर आपली साक्ष नोंदवण्यास सांगितले आहे. या आधी २३ फेब्रुवारी रोजी देखील आयोगाने पवार यांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावलं होते.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे  यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे एॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply