मुंबई विमानतळावर पाच कोटी रुपयांचे कोकेन जप्त; परदेशी महिलेला अटक

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी विमानतळावर सुमारे ४९० ग्रॅम कोकेन जप्त केले असून कोकेन तस्करीप्रकरणी केनियाची नागरिक असलेल्या एका महिलेला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत पाच कोटी रुपये आहे.

सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २८ सप्टेंबर रोजी वांबुई काने वंजिरू या महिलेला अटक केली. ती अदिस अबाबाहून इथिओपियन विमानाने आली होती. तिच्या बॅगची तपासणी केली असता पांढऱ्या रंगाची भुकटी सापडली. तपासणीअंती ते कोकन असल्याचे निष्पन्न झाले. वजन केले असता त्यात ४९० ग्रॅम कोकेन असल्याचे आढळले. आफ्रिकन वंशाच्या एका व्यक्तीने तिला एक पाकिट मुंबईला पोहोचवण्यासाठी दिले होते. मात्र मुंबईतील व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मुंबईतील व्यक्ती तिला संपर्क साधणार होती, असे वंजिरूने चौकशीदरम्यान सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सांगितले.

या कामासाठी वंजिरूला पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ती यापूर्वीही भारतात आली होती का याची तपासणी करण्यात येत आहे. अंमलीदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी तिला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. सीमाशुल्क अधिकारी आरोपींच्या साथीदाराबद्दल अधिक तपास करीत आहेत.

१११ किलो अंमलीपदार्थ नष्ट

मुंबई सीमा शुल्क विभाग-३ ने बुधवारी नवी मुंबईतील तळोजा येथे ८३ कोटी रुपये किंमतीचे १११ किलो अंमलीपदार्थ नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या अंमलीपदार्थमध्ये १९.४८ किलो हेरॉईन, ४.९५ किलो कोकेन, अंदाजे ४४ किलो चरस आणि गांजा यांचा समावेश होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply