मुंबई : राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावली महत्वाची बैठक; भोंग्यांबाबत ठरू शकते भूमिका

 

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या भेटीत भोंगे महाआरती आणि हनुमान चालीसा यावर चर्चा होण्याची शक्यता असून याबाबत पक्षाची नेमकी भूमिका काय असेल ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला निवडक पदाधिकारी आणि नेते या उपस्थित असणार आहेत. या बैठकीनंतर राज ठाकरे आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. 

राज ठाकरे यांनी काल (सोमवारी) ट्विट करून आज (मंगळवारी) भूमिका जाहीर करणार असल्याच सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आज अक्षय्यतृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. अशात राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून राज्यभरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. राज ठाकरेंनीही मनसैनिकांना आजच्या दिवशी कुठेही महाआरत्या न करण्याचं आवाहन केलंय. राज ठाकरे म्हणाले की, उद्या ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. कुठेही महाआरत्या करु नका. कोणाच्याही सणात बाधा आणू नका. भोंग्यांच्या विषय हा सामाजिक नसून धार्मिक आहे. त्यामुळे याबाबत माझी पुढची भूमिका मी उद्या (३ मे) ला ट्विटरवर जाहिर करेन असं राज ठाकरे म्हणाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply