मुंबई : रहिवासी इमारतीला आग, आगनिशामक दलाचे ७ बंब दाखल

मुंबई : महालक्ष्मी परिसरातील विठ्ठल निवास या पाच मजली इमारतीला आग लागली आहे. सध्या अग्नीशमन दलाचे ७ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

महालक्ष्मी परिसरातील विठ्ठल निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज दुपारी १२ च्या सुमारास अचानक आग  लागली. त्यानंतर रहिवाशांनी आगीची माहिती अग्नीशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्गीशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या अग्मीनशमन दलाच्या ७ बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तसेच शेजारच्या इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगितलं आहे. आग इतरत्र पसरू नये याची काळजी घेतली जात आहे.

ही लेव्हल दोनची आग आहे. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *