मुंबई : म्हाडाची सेवाशुल्कासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वसाहतींमधील रहिवाशांकडून थकीत सेवाशुल्क वसुलीसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सेवा शुल्काचा दुसरा हप्ता भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी म्हाडा वसाहतींतील भाडेवसुली कार्यालये येत्या शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता.२७) सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच घरबसल्या सेवाशुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मुंबई मंडळाच्या अखत्यारित ५६ हून अधिक वसाहती आहेत. म्हाडातर्फे सेवांपोटी रहिवाशांकडून सेवाशुल्क आकारते. मुंबई मंडळातर्फे सेवाशुल्क वसुलीसाठी एप्रिल २०२१ पासून अभय योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई मंडळाच्या योजनांतील गाळेधारकांकडून १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीची सुधारित दराने रक्कम व प्रत्यक्ष भरलेली रक्कम यांचे समायोजन करून उर्वरित रकमेची मागणी गाळेधारकांकडे केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply