मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शिंदे-ठाकरे गटात जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटात जोरदार राडा झाली असल्याचे पाहायला मिळाले. ठाण्यात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे केदार दिघे तसेच युवासेना पदाधिकारी उपस्तिथ होते.

त्याचवेळी शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. शिंदे गटाच्या महीलाकरत्या यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या जखमी कार्यकर्त्याला ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

शिंदे गटातील काही जणांनी राजन विचारे यांच्यावर पाण्याची बाटली फेकून मारली असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागात अनेकदा शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply