मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?; शिवसेनेचे स्पष्टीकरण

मुंबई: महाराष्ट्रात काही दिवसापासून सुरू असलेला सत्तेचा खेळ अजुनही संपलेला नाही. काल सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे  यांच्यासह शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिली आहे, त्यामुळे हा सत्तेचा खेळ अजुनही वाढणार असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना युती संदर्भात फोन केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात आता शिवसेनेकडून स्पष्टीकरण आले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, शिवसेनेत मोठी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. आता या सरकारची लढाई उच्च न्यायालयात होणार आहे. शिवसेनेने १२ आमदारांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, २१ जून रोजी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात आता शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे. 'सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला,अशा बातम्या समोर येत आहेत, या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असं शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान म्हणाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply