मुंबई : मुकेश अंबानींचा Reliance जिओच्या संचालकपदाचा राजीनामा; पुढील पिढीकडे कंपनीची धुरा

मुंबई : देशातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या रिलायन्स जिओ समुहाची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर सोपवली आहे. मुकेश अंबानी आता रिलायन्स जिओच्या संचालकपदावरून पायउतार झाले असून त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली आहे.

मुकेश अंबानी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिलायन्स जिओ इंडिया लिमिटेडने कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ती २७ जून म्हणजे कालपासून लागू झाली आहे.

याबाबत रिलान्स जियो इंफोकॉम लिमिटेड ने आज मंगळवारी माहिती दिली की, 'मुकेश अंबानी यांनी २७ जूनला राजीनामा दिला असून तो मान्य करण्यात आला आहे. तर कंपनीच्या संचालक मंडळाने आकाश अंबानी यांची कंपनीच्या संचालक मंडळावर अध्यक्षपदी नेमणुक करण्यासाठी परवानगी दिली आहे. तर पंकज मोहन पवार यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply