मुंबई : 'मी पुन्हा येईल असं म्हणालो नव्हतो'; राजीनामा देताना मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यात सुरु असणारा सत्तासंघर्ष आणि महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे टिकणार की कोसळणार याबाबतच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने आता पुर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं सांगितलं.

मात्र, यावेळी त्यांनी मी पुन्हा येईल अस बोललो नव्हत, असं म्हणत भाजपनेते देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'आम्ही मुंबई आणि हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्यांसमोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या, मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते पूजा हवी आहे.

माऊली म्हणतील ते मान्य आहे. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि‌ मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे, तसंच माझ्यापासून कोणी शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, 'मी मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा देत आहे. 'मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो.' सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

तसंच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला मुख्यमंत्री म्हणाले, 'अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे असं म्हणत त्यांनी बंडखोरांवरही निशाणा साधला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply