मुंबई : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेची मेट्रोवर कारवाई

मुंबई : मालमत्ताकराच्या वसुली  करता मुंबई महापालिकेने आता मुंबई मेट्रोवर धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईअंतर्गत पालिकेने मुंबई मेट्रो प्रशासकीय कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. कारावाईअंतर्गत मुंबई महापालिकेने डीएम नगर, अंधेरी पश्चिम येथील मेट्रोचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मुंबई मेट्रोकडे 2013 पासून 117 कोटी 62 लाख रुपयांचा कर थकित असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, या कारवाईनंतर मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आक्रमक पावित्रा घेतल्याचे दिसून येत असून, पालिकेकडून थेट मुंबई मेट्रोवरच धडक कारवाई करण्या आली आहे. यापूर्वीच मुंबई पालिकेने मुंबई मेट्रोला नोटीस बाजवली होती की, 21 दिवसात मालमत्ता कर भरणण्यास सांगण्यात आला होता. तसेच थकित कर मुदतीच भरला न गेल्यास पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा पालिकेकडून मुंबई मेट्रोला देण्यात आला होता. मात्र, या इशाऱ्यानंतरही हा थकीत कराचा भरणा केला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

यापुढेही हा कर न भरल्यास मलनिस्सारण वाहिन्याही खंडित करण्यात येतील, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. यानंतरही विशेष मुदत देऊनही कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव केला जाईल असा गंभीर इशाराही पालिका प्रशासनाने मुंबई मेट्रोला दिला आहे. या सर्व इशाऱ्यांनतर यावर मुंबई मेट्रोकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply