
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) लोकप्रतिनिधींनी पालिका मुख्यालयात धडक दिली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी गाफील असताना अचानक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात प्रवेश केल्यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही वेळातच उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात जमले आणि दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, हमरीतुमरी, धक्काबुक्की झाली. त्यानंतर अखेर सुरक्षारक्षकांनी सर्वाना कार्यालयाबाहेर काढल्यानंतर हा संघर्ष तात्पुरता मिटला. खासदार राहुल शेवाळे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी पालिका मुख्यालयातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात गेले होते.
पालिकेची मुदत गेल्या वर्षी संपल्यापासून पालिका मुख्यालयात तसा शुकशुकाटच असतो. पक्ष कार्यालयेही ओस पडलेली असतात. त्यातही शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात एकदमच शांतता असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पक्ष कार्यालयात येऊन बसत असतात. मात्र बुधवारी पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे गटाचे एकदोन माजी नगरसेवक उपस्थित असताना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक पक्ष कार्यालयात प्रवेश केला. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेण्यासाठी आलेले शिष्टमंडळ अचानक पक्ष कार्यालयात आले. पक्ष कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला हार घातला. शिंदे गटाच्या समर्थकांनी प्रवेश केल्यामुळे आधीच उपस्थित असलेले उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक सावध झाले. काही क्षणातच शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आशीष चेंबूरकर यांच्यासह शिवसैनिक, माजी नगरसेवक हेदेखील पक्ष कार्यालयात धडकले. या वेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने माजी नगरसेवक गणेश सानप, सचिन पडवळ, रमाकांत रहाटे आणि शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून खासदार राहुल शेवाळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी आमदार अशोक पाटील, विभागप्रमुख दिलीप नाईक, प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामेडी, गिरीश धानुरकर, कुणाल सरमळकर अशी मोठी फौज होती. थोडय़ा वेळानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी बाहेर जाणार इतक्यात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आले आणि दरवाजातच सगळे आमनेसामने आले. त्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी पुन्हा कार्यालयात जाऊन बसले. दोन्ही गटांचे पदाधिकारी कार्यालयात जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी, बाचाबाची, हमरीतुमरी सुरू झाली. प्रसारमाध्यमांचीही गर्दी वाढली. पालिकेतील कार्यालये सुटण्याच्या वेळीच झालेल्या या घटनेमुळे कर्मचारीही जमा झाले. सुरक्षारक्षकांनाही काय करावे ते कळेना. अखेर सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून सर्वानाच कार्यालयाबाहेर काढले.
महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचेच असून एकनाथ शिंदे गटाला पक्ष म्हणून अद्याप मान्यता मिळालेली नाही, असे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. सध्या नगरसेवकांची मुदत संपलेली असताना महापालिका कार्यालयात घुसण्यामागे शिंदे गटाचा हेतू काय होता, असा सवाल करीत पालिका आयुक्तांची याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली. ‘‘शिवसेना फुटीबाबत सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगापुढे याचिका प्रलंबित आहेत. त्यांच्या पक्षाला अद्याप आयोगाने मान्यताही दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल येईपर्यंत वाट पाहावी. वातावरण बिघडविण्याचा हा प्रयत्न असून शिंदे गटाची कृती चुकीची आहे,’’ असे सावंत म्हणाले
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


