मुंबई : मनसे आक्रमक; अजान सुरू असताना भोंग्यांवरुन हनुमान चालीसाचं पठण

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाले आहेत ४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने नवी मुंबईमध्ये मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी नेरुळच्या मशिद परिसरात अजान सुरू असतानाच स्पिकरचा  वापर करत मनसेकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं आहे. शिवाय मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम ची घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच मुंबईमधील काही मनसे सैनिकांची पोलिसांकडून धरपकड सुरु झाली आहे. शिवाय नेरुळ पाठोपाठ मुंबईच्या चारकोप परिसरात देखील अजानच्या वेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा स्पिकरवर वाजवली. तसंच मुंबईच्या कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभेच्या संजय नगरमध्ये अजानच्या वेळी मनसेने हनुमान चालिसाचे पठण करण्यात आलं आहे.

शिवाय आज सकाळी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली येथील जामा मशिदी जवळ हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये पोहचले असता. रबाले पोलिसांनी निलेश बाणखेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तसंच रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी डी ढाकणे यांनी हिंदू आणि मुस्लिम बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून सर्व मस्जिदींवर चोख पोलिस बंदोबस्त केले असल्याचं पोलिसांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply