मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कारवाई होणार: किरीट सोमय्या

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझी खोटी सही करून घेतली आहे. माझ्या नावाने फेक एफआयआर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करून घेतली आहे. या लोकांनी खालची पातळी गाठली आहे. या सगळ्यांचे पुरावे राज्यपालांना देणार असल्याचे, भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या म्हणाले.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जीवनात काही करो मला त्याच काही देणं- घेणं नाही, पण जर ते मातोश्रीचे पोलीस आयुक्त म्हणून माफियागिरी करणार असतील तर संजय पांडेना सोडणार नाही, उद्धव ठाकरे परिवाराला सोडलं नाही तर संजय पांडे किस खेत की मुली है, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा डी गँगशी संबंधित लकडावाला सोबत व्यवहार झाला असल्याचा आरोप केला. यावर बोलताना सोमय्या यांनी राऊतांवर आरोप केले. संजय राऊत काहीही बोलतात, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा ३६ चा आकडा हे जगासमोर अशा पद्धतीने का दाखवतात, असा सावल सोमय्या यांनी केला. मी केचप लावला आणि ठाकरे सरकार ने महाडेश्वर यांना अटक केली, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

आज आम्ही राज्यपालांना प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, सुनील राणे, आणीवकिल भेटायला जात आहोत. मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे माफियागिरी करत आहेत. संजय पांडे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर जो हल्ला झाला त्यात खार पोलीस ठाण्याचे अधिकारी सहभागी झाले होते, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.

माझ्या गाडीवर दगडफेक झालीच कशी पोलीस काय डोळे बंद करून बसले होते का, सगळे लाईव्ह दिसत होत की पांडेंची इच्छा होती किरीट सोमय्या यांच्या तोडावर हा दगड लागला पाहिजे, असंही सोमय्या म्हणाले. आम्ही केंद्रीय गृह सचिवांना देखील सांगितले आहे, मुंबई पोलीस शिवसेनेच्या गुंडाच संरक्षण करत आहेत. संजय पांडेंनी मी ज्या एफआयआरवर सही केली नाही. त्याची चौकशी लावली हे सर्व गैर आहे. संजय पांडे घाबरलेले आहेत. त्यांना किरीट सोमय्या सोडणार नाही. राज्यपालांना मी सांगणार आहे. याबद्दल चौकशी केली पाहिजे आणि संजय पांडे यांच्यावर कारवाई होणारच, असंही किरीट सोमय्या म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply