मुंबई: पुढील दोन दिवस महाराष्ट्रात विजांसह पाऊसाची शक्यता

मुंबई: राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊसची  शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी जोरदार वारे असणार आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

३ आणि ४ मे रोजी विजांच्या कडकडाट‌ व गडगडाटासह, हलका ते मध्यम पावसासह जोरदार वारे (३०-४० किमी प्रतितास) काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध विभागात ३ आणि ४ मे रोजी पाऊसची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

३ मे

३ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊसासह  पावसासह उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

४ मे

३ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ५ मे रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply