मुंबई: : पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावुक म्हणाले, पहिल्यांदाच दीदी रक्षाबंधनाला नसणार

मुंबई: : मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. मी हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करत आहे. हा पुरस्कार जनतेचा आहे. माणूस आपल्या वयाने नाहीतर आपल्या कार्याने मोठा असतो, अस लतादीदी कायम म्हणायच्या असंही नरेंद्र मोदी म्हणाले. दीदींनी संगीतात अस स्थान निर्माण केलं की त्यांना त्या क्षेत्रातील सरस्वती मानतं होते. सिनेमातील चार पाच पिढ्यांना त्यांनी आवाज दिला आहे. विश्व त्यांना स्वरसाम्राज्ञी मानतं होते, असंही मोदी म्हणाले.

लतादीदींना आपण पाहिले हे आपले भाग्य आहे. दीदींनी संगीत जगतावर छाप सोडली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासून देशाला स्वर दिला, असंही मोदी म्हणाले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी भावुक झाले, पहिल्यांदाच असं होईल रक्षाबंधनाला लतादीदी नसतील.

या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मंत्री आदित्य ठाकरे , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply