मुंबई: नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही; ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

मुंबई: नवाब मलिक यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मात्र, ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत मलिकांनी कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला माही. ईडीने आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण आज सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही असे कोर्टाने यावेळी संगीत्याले आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *