मुंबई : दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी BMC सज्ज, १५२ कृत्रिम तलावांची केली व्यवस्था

मुंबई : संपूर्ण मुंबईत गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. अशातच आज मुंबईत दीड दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका (BMC) सज्ज झाली असून मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, सातबंगला, मढ, गोराई या चौपाट्यांसोबतच या ठिकाणी नैसर्गिक तलावाची महापालिकेने चोख व्यवस्था केली आहे. शिवाय संपूर्ण मुंबईत (Mumbai) गणपती विसर्जनासाठी १५२ कृत्रिम तलाव देखील निर्माण केले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून प्रमुख विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज अशी १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका देखील उभ्या करण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply