मुंबई : तो व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी कडक कारवाई व्हायला पाहिजे : रुपाली चाकणकर ; पोलिसांना पत्रव्यवहार करून कडक कारवाई करण्याची केली मागणी

मुंबईत मुंबादेवी येथे गणपती मंडपाजवळ पक्षाचा फलक लावण्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. विनोद अरगिळे अस मारहाण करण्यात आलेल्या मनसेचे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली असून आरोपी हा कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत पोलिसांना पत्र पाठवल आहे. त्या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.  

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याची दखल महिला आयोगाने घेतली आहे. संबंधित प्रकरणी सुमोटो दाखल करत, पोलिसांना कडक कारवाई करण्याबाबत पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे. संवादाच्या माध्यमातून वाद मिटवायला हवा होता. असा कायदा हातात घेणे चुकीचं आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे अस चाकणकर म्हणाल्या आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, महिलेला मारहाण करणारी व्यक्ती ही आरोपी आहे. कोणत्याही पक्षाची असली तरी कारवाई केली पाहिजे अस रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. त्या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply