
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करीत मराठी माणसांवर मुस्लिमांचे राज्य आणण्याचा प्रयत्न करणारेच तोतया असल्याचा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी रविवारी केला. महापालिकेत पंचवीस वर्षे सत्ता असताना विकास कामांवर मते मागण्याऐवजी मुस्लीम तुष्टीकरणाची वेळ का आली आणि मुंबईचा रंग तुम्ही का बदलू पाहात आहात, असा सवालही शेलार यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘जागर मुंबईचा’अभियान सुरू केले असून पहिली सभा वांद्रे पूर्वमध्ये शासकीय वसाहतीतील मैदानात झाली. खासदार पूनम महाजन, मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर, आमदार पराग अळवणी त्यास उपस्थित होते.
शेलार म्हणाले, राजकीय फायद्यासाठी मराठी मुस्लीम संकल्पनेचा प्रचार करीत आहेत. त्यांना मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय, मराठी हिंदू या संकल्पना मान्य नाहीत, त्यांच्याशी वैर का? त्यांनी मतांसाठी मुस्लीम तुष्टीकरण सुरू असले तरी मराठी आणि मुस्लीमही भाजपच्याच पाठीशी उभे राहतील. कोकणातील मराठी मुस्लीम बांधव आजपर्यंत कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते सण व उत्सवात आणि सुख दु:खात सहभागी होतात. मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय ? जाती धर्माच्या आधारे मते मागण्याची वेळ का आली, असा सवाल शेलार यांनी ठाकरे यांना केला.
शेलार म्हणाले, महापालिकेतील बारा हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे काय झाले, हा प्रश्न आम्ही विचारणार. करोनाकाळात किती भ्रष्टाचार केला, याचा जाब मागणार आहोत. दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध ठेवणारे नवाब मलिक मंत्रिमंडळात होते. महाविकास आघाडी सरकारने जनतेचे नुकसान केल्याची टीका त्यांनी केली.
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागील सूत्रधाराचा शोध नाही’
ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराचा छडा राज्यात तुमची सत्ता असताना का लावला नाही, असा सवाल खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्याचे नाव न घेता या महाभारतातील शकुनी मामा कोण आहे, हे सर्वाना माहीत आहे, असे सांगून महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येचा उल्लेख एका बडय़ा नेत्याने यापूर्वी त्यांना प्रत्युत्तर देताना केल्याची आठवण सांगितली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


