मुंबई : चेन्नईला खेळ उंचावण्याची गरज; ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज पंजाबशी लढणार

मुंबई : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या आयपीएलच्या मोसमात सलग दोन लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता लढत या संघासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जसमोर ब्रेबॉर्न येथे होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्जचे आव्हान असणार आहे. या लढतीत चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना आपला खेळ उंचवावा लागणार आहे. पंजाब किंग्जचा संघही पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसेल.

चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८ व २०२१ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मागील मोसमात चौथ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाच्या मोसमात पहिल्या दोन लढतींत अपयशी ठरला आहे. पहिल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स, तसेच दुसऱ्या लढतीत लखनौ सुपर जायंटस्‌ संघाकडून चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या लढतीत फलंदाजांनी निराशा केली. दुसऱ्या लढतीत मात्र २१० धावांचा डोंगर उभारल्यानंतरही लखनौ सुपर जायंटस्‌ संघाकडून त्यांना हार सहन करावी लागली. प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंग यांनी या पराभवाचे खापर खेळपट्टीवर पडलेल्या दवावर फोडले असले तरी प्रत्यक्षात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना दबावाखाली खेळ उंचावण्याची गरज आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply