मुंबई : घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालायाच्या इमारतीला भीषण आग; काहीजण अडकल्याची भीती

मुंबईः मुंबईतल्या घाटकोपर पूर्व भागातील एका रुग्णालयाताल भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे रुग्णांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला अडचणी येत आहेत.

घाटकोपर पूर्व भागात असलेल्या पारख रुग्णालयाला ही भीषण आग लागली आहे. रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागच्या बाजूला आग लागली. काही क्षणांमध्ये ही आग पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचली.

घटनास्थळी अग्मिशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत. शिवाय काही स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयात गंभीर आजार असलेले व्हेंटिलेटरवचे रुग्ण उपचार घेत आहेत. काहींना चालताही येत नाही, असेही रुग्ण आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी जवानांना कष्ट घ्यावे लागत आहेत.

वरच्या माळ्यावरील काही रुग्ण खिडक्यांमधून हात काढून खालच्या लोकांना वाचवण्यासाठी गयावया करीत आहेत. सगळ्याच रुग्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply