मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर कोर्ट कमिशनरच्या गंभीर टिपण्णी

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पहाणी करण्यासाठी नेमलेल्या पाडळीकर कोर्ट कमिशनरने अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालात त्यांची गंभीर टिप्पणी केल्या असून पळस्पे ते पोलादपूर या दरम्यानच्या १४० पैकी ५ किलोमीटरचा रस्तादेखील वाहने चालवण्यासाठी सुस्थितीत नसल्याचे मत मांडले आहे. योग्य पद्धतीने मार्गिका न ठेवल्याने अपघाती ठिकाणे वाढली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले न ठेवल्याने नसल्याने पावसाळ्यात पाणी साचून रस्ता नादुरुस्त होण्याची शक्यता या अहवालातून वर्तविण्यात आलेली आहे. अलिबाग येथील वकील अजय उपाध्ये यांनी दाखल केलेल्या दाव्यामुळे येथील दिवाणी न्यायालयाने पी. एन. पाडळीकर यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक केली होती. त्यानुसार त्यांनी १ ते २ फेब्रुवारी रोजी महामार्गाच्या कामाची पळस्पे ते पोलादपूर या दरम्यान महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली होती. या कोर्ट कमिशनरने अनेक गंभीर बाबींची नोंद करून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. सदरचे काम नकाशाप्रमाणे व्यवस्थित मोजमापे न घेताच अयोग्य व्यवस्थापनाखाली झालेले आहे. जागोजागी असलेल्या खड्ड्यांमुळे सलगपणे एकाच वेगाने या मार्गावर वाहने चालविणे शक्यच नाही. सेवा रस्ता, सुकेळी खिंडीमध्ये संरक्षण कठडे, आरसीसी बांधकामाचा निकृष्ट दर्जा, बांधकामासाठी पाण्याचा कमी वापर, जागोजागी पडलेल्या भेगा यामुळे हा रस्ता मानवी वापरासाठी नादुरुस्त असल्याचे म्हणणे कोर्ट कमिशनरने अहवालात नमूद केले. सदर रस्ता तयार होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जुन्या मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी चारपदरी महामार्गाची मागणी कोकणवासींमध्ये सातत्याने केली जात होती; मात्र, आताचा रस्ता हा त्यापेक्षाही खराब असून ठिकठिकाणी अपघातांना आमंत्रित करणारा आहे, असे मत पी. एन. पाडळीकर यांनी अहवालात नमूद केले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply