मुंबई: राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला चार तारखेचा अल्टीमेटम दिला होता. तो उद्या संपत आहे. त्या अनुषंगाने आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांची बैठक घेतली. त्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. पोलीस महासंचालक म्हणाले की नुकतीच गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात सक्षम आहे. या पूर्वी समाजकंटक व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
एसआरपी आणि होमगार्डची कुमक तैनात करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्व वरिष्ठांना गरज वाटल्यास सर्व अधिकारांचा वापर करण्याची पूर्व कल्पना दिली आहे. सामाजिक एकोपा जपण्यासंदर्भात स्थानिक नागरिकांमध्ये बैठका घेतलेल्या आहेत असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले. कायद्याची अंमलबजावणी करण्यास सांगून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. जो कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे महासंचालक म्हणाले.
राज ठाकरेंवरती कारवाई होणार का? या प्रश्नावर पोलीस महासंचालक म्हणाले की औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा अभ्यास केला असून ते योग्य ती कारवाई करतील. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई होईल असेही रजनीश सेठ म्हणाले आहेत. पुढे रजनीश सेठ म्हणाले की आम्ही १५ हजार लोकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. १३ हजार लोकांना १४९ ची नोटिस दिली आहे.
धुळे येथे तलवारींचा साठा मिळाला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. ही हत्यारं जालना येथे नेली जात होती. संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. आतापर्यंत सर्व धर्मिय नागरिकांची बैठक घेतली आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंच्या पुढच्या सभेला परवानगी देणार का? या प्रश्नावर पोलीस महासंचालक म्हणले ''पुढच्या सभेचं पत्रक आल्यानंतर परिस्थिती पाहून परवानगी दिली जाणार''.हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

