मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची अखेर सर्वोच्च न्यायालयात वर्णी लागली आहे. मागील दोन महिन्यांपासून न्या. दत्ता यांची बढती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीवरून केंद्र सरकारचा निर्णय केंद्रीय न्याय व विधी मंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केला.

न्यायमूर्ती दत्ता यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६५ रोजी झाला. न्यायमूर्ती दत्ता यांचे वडिलही कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून १९८९ मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्याच वर्षी त्यांनी वकील म्हणून नावनोंदणी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये घटनात्मक आणि दिवाणी प्रकरणे लढवली.

ऐन करोना काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचा पदभार सांभाळला होता. नियुक्तीनंतरही न्या. दत्ता यांनी महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये विशेषत: जनहित याचिकांवर महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत.

संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान व्हिसीमार्फत उत्तम कामकाज सांभाळले. करोना विषयक प्रकरणे, राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश, लवासावरील प्रलंबित निकाल, एस.टी. कर्मचाऱ्याच्या संपाचा तिढा, मेट्रो ३ कारशेड प्रकरण, पवई सायकल ट्रॅक प्रकरणाबाबत योग्य न्यायनिवाडे केले.

तसेच नुकतंच तृतीयपंथीयांच्या सरकारी नोकरीतील समावेशाबाबतच्या अन्य काही जनहित याचिकांवर न्या. दीपांकर दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयातील कार्यकाळात न्यायनिवाडे केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply