मुंबई: अ‍ॅमवेवर ईडीची मोठी कारवाई; ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई: नेटवर्क मार्केटिंग कंपनी अ‍ॅमवेवर ईडीने मोठा झटका दिला आहे. ईडीने कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. ईडीने कंपनीच्या ५ ऑफिसवरती छापेमारी करण्यात आली आहे. ईडीला तपासाच्या दरम्यान आढळले की, अ‍ॅमवे कंपनी नेटवर्क मार्केटींगच्या च्या नावाखाली 'पिरॅमिड फ्रॉड' करत होती. कंपनीच्या यादीमध्ये आणखी सदस्य जोडून त्यांची कागदावरच विक्री करत असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. कंपनीचे सदस्य होऊन लोक श्रीमंत होतील असे सांगून कंपनीकडून मल्टीलेवल मार्केटींग सुरु होते. 

ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, लोकांना अ‍ॅमवे कंपनीमध्ये सदस्य होण्यास सांगितले जात होते. यानंतर सदस्याला कंपनीकडून विकला जाणारा माल घेण्यास सांगितले जात असत. जर सदस्याने अधिक सभासद बनवले आणि त्या सदस्यांनी अधिक सभासद झाल्यानंतर वस्तू खरेदी केल्यास त्यांना त्याचे कमिशन मिळणार असे सांगितले जात असत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या एजंटना सांगितले होतं की, अगोदर विक्री करा आणि मगच वापरा. म्हणजेच, जो व्यक्ती या कंपनीचा सदस्य होणार त्याला कंपनीकडून विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत.

अ‍ॅमवे कंपनीने २००२-२०२२ या कालावधीमध्ये आपल्या व्यवसायातून २७,५६२ कोटी जमा केले आहेत. यापैकी कंपनीने भारत आणि अमेरिकेतील सदस्य आणि वितरकांना ७५८८ कोटी रुपयांचे कमिशन दिले आहे. कंपनीचे संपूर्ण लक्ष लोक सभासद बनून कसे श्रीमंत होऊ शकतात याचा प्रचार करण्यावर आहे. कंपनी उत्पादनांकडे लक्ष देत नाही. मल्टीलेवल मार्केटींग हा या कंपनीचा मूळ उद्देश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply