मुंबई : अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून जमवले १.८० कोटी रुपये; सरकारी वकिलांचा दावा

मुंबई : आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी १.८० कोटी रुपये गोळा केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गिरगाव कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. 

अ‍ॅड घरत म्हणाले, पाच महिन्यांपासून एसटीच्या सरकारमध्ये विलिनिकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकांकडून कोर्टात केस लढणारे अ‍ॅड . गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ५३० रुपये प्रमाणे एकूण १.८० कोटी रुपये गोळा केले.

हल्ल्याच्या घटनेनंतर सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती, त्यावेळी त्यांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीचा कालावधी आज संपल्यानं त्यांना गिरगावच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या सुनावणीदरम्यान सरकारी वकिल आणि सदावर्ते यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून १.८० कोटी रुपये जमवल्याचं सांगितलं. पण यावर उत्तर देताना सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी म्हटलं की, पैसे घेतल्याप्रकरणी एकाही कर्मचाऱ्यानं तक्रार दिलेली नाही. मग या मुद्द्याचं प्रयोजन काय?

दरम्यान, ८ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या मुंबईचं निवासस्थान सिल्व्हर ओक इथं आंदोलक कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. यावेळी हे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रक्षुब्ध झाले होते, अनेकजण यावेळी पवारांना आक्षेपार्ह शब्दांत बोलत होते. या प्रकाराचे मोठ्या प्रमाणावर राजकीय पडसाद उमटले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांना उचकवल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply