मुंबई : अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अ‍ॅड  गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली होती. तिचा कालावधी आज संपल्याने सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टात न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयान सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची (13 एप्रिल) पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात शुक्रवारी किल्ला कोर्टाने इतर 109 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर त्यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर इतर 109 आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज त्याचा कालावधी संपत असल्याने पोलिसांना सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर केले त्यावेळी कोर्टाने सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची म्हणजेच 13 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कर्मचाऱ्यांना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी किल्ला कोर्टाता बाजू मांडताना म्हटले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply