मुंबई : अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड, एकाला अटक

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत सत्तासंघर्ष पेटला असून तमाम शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने करत आहेत. दोन-तीन दिवसांपासून शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करत आहेत. दिवसेंदिवस शिवसेना आणि शिंदे गटात सत्तासंघर्षाचा वाद वाढत असतानाच शिवसैनिक बंडखोर अपक्ष आमदारांनाही लक्ष्य करत आहेत. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केलीय. कार्यालयावर हल्ला करणारे शिवसैनिक सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. त्यामुळे एका शिवसैनिकाला पोलिसांना अटक करण्यात यश आलं असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद अग्रवाल हे 2019 च्या निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. तसेच अग्रवाल यांनी एकनाथ शिंदे यांनाही समर्थन देत असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळं शिवसेनेच्या गोटात अशांतता पसरली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान,अग्रवाल यांच्या कार्यालयावर आज दुपारी शिवसैनिकांनी धडक दिली.

शिवसैनिकांनी अग्रवाल यांच्या कार्यलयाची तोडफोड केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे अपक्ष आमदारा आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनाही कडक सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, विनोद अग्रवाल यांच्या घराजवळ फक्त दोनच पोलिसांचा बंदोबस्त असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडींमुळं अग्रवाल यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आमच्या जीवाला धोका असून पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त वाढवला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply