मुंबई:  अक्षय्य तृतीयेला मनसेची राज्यभर महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे ला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभर महाआरती करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहे. त्यानुसार आता मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आज (मंगळवार) राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय झाला. तसेच या बैठकीत अयोध्या दौरा आणि 1 मे ची सभा यासाठी नियोजनाबाबत चर्चा झाली. 

शिवतीर्थ बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, गजानन काळे, शिरीष सावंत आणि इतर नेते उपस्थित होते. ३ मे चं अलटीमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं होतं. त्याचप्रमाणे मशिदीवरील भोंग्या संदर्भातील उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे संतोष पाचलग यांनाही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत याचिकेतील सर्व बारकावे आणि अतिरिक्त माहिती याविषयी चर्चा त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत केली. ३ मे ला मशिदीवरील भोंगे उतरवले नाही, तर मनसे नेमकी काय भूमिका घेणार? काय पावलं उचलली जातील? यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच मनसेचे शिष्टमंडळ आता ॲडीशनल सीपी डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेण्यासाठी निघाले असून भोंग्याच्या विषयावर ही भेट असेल. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातून दोन घोषणा केल्या. पहिली म्हणजे १ तारखेला औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार. आणि दुसरी म्हणजे अतिशय महत्त्वाचं ५ जून रोजी अयोध्येला जाणार. या दौऱ्यात कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. १० ते १२ ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. राज ठाकरे मागच्या काही काळापासून आपली भूमिका अतिशय प्रखरपणे मांडत आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply