मुंबई : अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात भीषण आग; चार ते पाच दुकानं जळून खाक

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने मोठा भडका घेतला. बघता-बघता आगीत तीन ते चार दुकाने जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. 

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत चार ते पाच दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. याशिवाय अंधेरी रेल्वे हद्दीतील काही भाग सुद्धा जळून खाक झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, आज म्हणजे शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासअंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात असलेल्या दुकानांना अचानक आग लागली.

बघता-बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं. अचानक आग लागताच स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत पाच दुकानं जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. या संदर्भात संदर्भात डी.एन.नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *