मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा फोन; 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल, पोलीस कंट्रोलला आला फोन

मुंबई : मुंबई शहर दहशतवाद्यांच्या नेहमीच टार्गेटवर राहिलं आहे. भारताची आर्थिक राजधानी असल्याने अवघ्या जगाचं लक्ष मुंबईवर असतं. मात्र आज मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोनने मोठी धावपळ झालेली पाहायला मिळाली. मुंबईच पून्हा एकदा दहशतवादी हल्ला होणार असल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्याने वातावरण काहीचं चिंताजनक बनल होतं. मात्र पोलिसांना सूत्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली.

मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करुन देण्यात आला होता. आरोपीने फोनवर १९९३ साली मुंबईत घडवण्यात आलेल्या स्फोटाप्रमाणेच घातपाताचा इशारा दिला होता. तसेच या स्फोटानंतरही राज्यात दंगली घडतील, असंही म्हटले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने तपास सुरू केला. या तपासात फोन करणाऱ्या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी मालाडच्या पठाणवाडी परिसरातून फोन करणारा व्यक्ती आरोपी नबी खान उर्फ केजीएन लाला (वय ५५) याला अटक केली आहे.

या आरोपी विरोधात आझाद मैदान येथे गुन्हा दाखल करून त्याचा ताबा दहशतवाद विरोधी पथकाने आझाद मैदान पोलिसांना दिला आहे.या आरोपीवर जबरी चोरी, विनयभंग अतिक्रमण यासारखे १२ गुन्हे दाखल आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply