मुंबईत तुफान पाऊस, ८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी, रायगडसाठी रेड अलर्ट

मुंबई/ रायगड/ रत्नागिरी: मुंबई, उपनगरे, ठाणे आणि रायगड, रत्नागिरीत गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील अनेक सखल भागांत पावसाचं पाणी रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रायगडसह कोकणातही अनेक नद्या दूथडी वाहत आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्यातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, मुंबईत ८ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

भारतीय हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. घाट परिसरात जोरदार पाऊस होईल. तसेच मुंबईत ५ जुलै, ७ आणि ८ जुलै रोजी मुसळधार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे. रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई, उपनगरे, कोकण आणि राज्याच्या अनेक भागात काल रात्रीपासून तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन संबंधित भागांतील नागरिकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply