मुंबईत आढळला कोरोनाचा नवा XE व्हेरियंट; भारतातील पहिलीच नोंद

मुंबई : कोरोनाचा काळ आता संपल्यात जमा झाला असतानाच आता आणखी एक नवा कोरोनाचा व्हेरियंट भारतात पहिल्यांदाच आढळून आला आहे. XE नामक हा व्हेरियंट असून तो आज मुंबईत आढळून आला. ३७६ नमुन्यांची चाचणी केल्यानंतर यांपैकी एक रुग्ण या नव्या XE व्हेरियंटचा  संसर्गबाधित आढळून आला आहे. इंडिया टुडेनं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे

हा नवा XE व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षाही जास्त पसरणारा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये (UK) आढळला होता. ताज्या सिरो सर्व्हेच्या अहवालानुसार, मुंबई महापालिकेनं म्हटलं की, मुंबईतील २३० नमुने सिरो सर्व्हेसाठी पाठवण्यात आले होते, यांपैकी २१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या रुग्णांना ऑक्सिजन किंवा आयसीयूची गरजही भासली नव्हती. यांपैकी XE व्हेरियंटचा एक रुग्ण तर आणखी एक Kappa व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, जे २१ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते त्यांपैकी नऊ जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलो हेते. तर इतर सर्वांनी एकही डोस घेतला नव्हता.

हा नवा XE व्हेरियंट ओमिक्रॉन BA.1 आणि BA.2 या दोन्ही व्हर्जन्सच्या म्युटंट हायब्रिड व्हर्जन आहे. सध्या जगभरात या व्हेरियटंचे खूपच कमी संसर्गबाधित आढळून आले आहेत. जागतीक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, हा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षआ १० टक्के जास्त संसर्गकारक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply