मुंबईच्या अंधेरीत धावत्या बेस्ट बसला अचानक आग; वाहनाचा झाला कोळसा

Mumbai news : मुंबईतून धक्कादायक बातमी हाती आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील चकाला परिसरामध्ये धावत्या बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती अग्निशमन दलाचे तीन ते चार अग्निबंब घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांचं आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील चकाला परिसरामध्ये बेस्ट बसला मोठी आग लागल्याच्या घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसला आग लागली.

अंधेरी आगरकर चौकातून साकीनाकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर चकाला या ठिकाणी जात असलेल्या बसला भीषण आग लागली. बसमध्ये ५० ते ६० प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याची घटना घडल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती निर्माण झाली. (Mumbai Best Bus Fire)

बेस्ट बसला आग लागल्यानंतर वाहतूक पोलिसांना प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आलं आलं आहे. बेस्ट बसला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे तीन ते चार अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीत बेस्ट बस (Bus) संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *