मुंबई :  ‘मातोश्री’ समोरून जाताना मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; रेकी केल्याचा आरोप

मुंबई : मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली आहे. दरम्यान, काहीच वेळापूर्वी भाजपनेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाड्यांचा ताफा मातोश्रीसमोरून जात असताना शिवसैनिकांकडून कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळील कलानगर सिग्नलजवळ हा हल्ला करण्यात आला आहे. उद्या हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर कंबोज यांच्याकडून मातोश्रीची रेकी केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *