माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर; प्रवाशांसाठी सोडल्या ज्यादा बसेस

मुंबई: मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात होता. गदग एक्सप्रेस आणि पद्दुचेरी एक्सप्रेस  एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने दोन एक्सप्रेस गाड्या धडकल्या.या धडकेनंतर दादर-पद्दुचेरी या एक्सप्रेसचे मागील बाजूचे तीन डबे रुळांवरून घसरले. अजूनही याठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून हे काम आज (शनिवार) दुपारी १२ पर्यंत पुर्ण होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या असून ठाणे/मुलुंड या रस्त्याने प्रवास करावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

मध्य रेल्वेने आवाहन केलं की, अप फास्ट उपनगरीय प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ठाणे/मुलुंड येथून रस्ता वाहतुकीचा पर्याय निवडावा. तेथून त्यांच्या सोयीसाठी मुंबईच्या दिशेने जादा बसेस चालवल्या जातील. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे. तसेच रेल्वेचे अपघातग्रस्त डबे हटवण्याचे, ओएचई वायर आणि ट्रॅक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत, जलद मार्गावरील वाहतूक भायखळा आणि माटुंगा स्थानकांवरील धिम्या मार्गावरून वळवली जाईल अशी माहिती रेल्वेने दिली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply