लोणावळ्यात मन सुन्न करणारी घटना
पुण्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी आली आहे. एका अभियंत्याने लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवरून उडी मारून आयुष्य संपवलं आहे. मानसिक त्रासातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनंतर पोलिसांनी त्याची शोधाशोध करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या अभियंत्याने मृत्यूपूर्वी पत्नीसह एका परिचिताला शेवटचा मेसेज केला होता. हा मेसेज वाचून सर्वच सुन्न झाले आहेत. ती वेळ टाळता आली नसती का? असा प्रश्न केला जात आहे.
वीरेंद्र सिन्हा असं या बाणेर येथील आयटीत काम करणाऱ्या अभियंत्याचं नाव आहे. पत्नी रियासोबत वाद झाल्याने तो पुण्याहून लोणावळ्याला कारने आला होता. या ठिकाणी आल्यावर त्याने रात्री पत्नीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही. त्यामुळे त्याने पत्नीसाठी एक मेसेज आणि व्हिडीओ पाठवला आहे. त्यात त्याने त्याच्या मनातील गोष्ट बोलून दाखवल्याचं सांगितलं जातं. पत्नीसह त्याने मित्रांना आणि परिचितालाही मेसेज पाठवल्याची बाब समोर आली आहे. एका परिचिताला पाठवलेल्या मेसेजमधून त्याने त्याची कार कुठे आहे आणि कारची चावी कुठे आहे याची माहिती दिली होती.
काय होतं या मेसेजमध्ये?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीरेंद्र यांनी एका परिचिताला हा शेवटचा मेसेज केला होता. माझी कार टायगर पॉइंट येथे उभी आहे. गाडीची चावी टायरखाली ठेवली असून मोबाईलही गाडीतच आहे, असं त्याने मेसेजमध्ये म्हटलं होतं. जेव्हा पत्नी रियाने हा मेसेज वाचला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. रिया आणि वीरेंद्रच्या मित्रांनी तात्काळ लोणावळ्याला धाव घेतली. वीरेंद्र यांनी सांगितलेल्या ठिकाणीच निळ्या रंगाची कार होती. चावीही मिळाली आणि मोबाईलही सापडला. पण वीरेंद्र काही दिसत नसल्याने त्यांच्या काळजाची धकधक वाढली. तेवढ्यात पोलिसांनी वीरेंद्र यांचा मृतदेह रिया यांना दाखवला.
मला काही लोक…
वीरेंद्र यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांनी मेल केला होता. मला काही लोक जगू देत नाहीत, अशी वेदना त्यांनी या व्हिडीओतून व्यक्त केली होती. तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाचा पाढाही त्याने वाचला होता. दरम्यान, वीरेंद्र यांची पत्नी रिया यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास सुरू आहे.
अखेर मृतदेह सापडला
वीरेंद्र सिन्हा यांनी पहाटे दरीत उडी मारून जीव दिल्याचं सांगितलं जातं. पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने तब्बल पाच तास शोध मोहीम करून त्यांचा मृतदेह शोधला. त्यानंतर आता त्यांचा मृतदेह पोस्टमार्टेमला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

