मनसेने शिवसेनेला डिवचले, रामनवमी निमीत्त सेना भवनासमोर लावली हनुमान चालीसा

मुंबई: राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर मनसेवरती काही प्रमाणात टीका झाली. राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवरुन पक्षातील आणि राज्यातील मुस्लीम समाज नाराज झाला आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले आहेत. आज तर मनसेने (MNS) थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेने आज रामनवमी निमीत्त शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या 'शिवसेना भवनास'मोर लाऊडस्पीकर लावले आहेत.

राज ठाकरेंनी दिलेली शिवाजी पार्कवरुन दिलेली हाक कुठेतरी कार्यकर्ते पाळताना दिसत आहेत. मनसेने लाऊडस्पीकरवरती हनुमान चालीसा लावली होती. आणि तीही शिवसेना भवनासमोर. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी मनसेचे लाऊडस्पीकर जप्त करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील भाषण चांगलंच वादग्रस्त ठरलं होते. पक्षातीलच पदाधिकारी या वक्तव्याने नाराज झाले होते. अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. पुण्यातील मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा आदेश न पाळल्याने शहर अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. त्याचबरोबर राज्यभरातून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला समर्थन केले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply