मध्य रेल्वेची इंधनखर्चात ८८ कोटींची बचत

पुणे - मध्य रेल्वेने एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हेड ऑन जनरेशन (एचओजी) (HOG) वीजपुरवठा प्रणाली अवलंबून डिझेलवरील खर्चात ८७.७७ कोटींची निव्वळ बचत केली आहे. एचओजी तंत्रज्ञानाचा वापर एलएचबी प्रकारच्या कोचमध्ये केला जात आहे. मध्य रेल्वेने ७५ एलएचबी कोचमध्ये एचओजी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एचओजी तंत्रज्ञानामध्ये थ्री-फेज इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमधून वीज पुरवली जाते. जी पॅन्टोग्राफद्वारे थेट इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमधून पॉवर काढून मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यातील एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक बल्ब पंखे आणि पॅन्ट्री आदींमध्ये वीजपुरवठा केला जातो. एचओजी तंत्रज्ञानाचे फायदे
  • पॉवर कारमधील डिझेलचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने आर्थिक बचत
  • वायुप्रदूषणात घट
  • जनरेटर कार काढून टाकल्यामुळे ध्वनी प्रदूषणात घट
  • पॉवर कारच्या जागी प्रवासी कोच जोडून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढते, परिणामी उत्पन्न वाढते
  • जनरेटिंग उपकरणांची कमी संख्या, कमी देखभाल आदींमुळे चांगली विश्‍वासार्हता राहते


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply