मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसावर जीवघेणा हल्ला

ठाणे : ठाण्यातील माजीवड येथे मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करीत असताना एक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस शिपाई गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी राबॉडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागनाथ कांदे असे जखमी पोलीस कर्मचार्यांचे नाव आहे. तर, अनिल गुप्ता असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस शिपाई नागनाथ कांदे हे वाहतूक शाखेतील कापूरबावडी पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. धूलिवंदन निमित्ताने वाहतूक नियंमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कारवाई करण्यासाठी त्यांची नेमणूक माजीवडा येथे करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री याच भागातून भागीरथ चव्हाण आणि त्याचा मित्र अनिल गुप्ता हे दोघेही दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी कांदे यांनी त्यांची दुचाकी अडवून कारवाईस सुरूवात केली. कांदे यांना कारवाई करू नका अशी दोघेही विनंती करत होते. परंतु कांदे यांनी त्यांची विनंती अमान्य केल्याने अनिलने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक घातला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply