मतं जातील या भीतीनं एकेकाळी मोठमोठे नेते मंदिरात जायला लाजायचे :देवेंद्र फडणवीस

मुंबई : एकेकाळी मोठ्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जायची लाज वाटत होती. कारण कुणी मंदिरात जाताना पाहिली तर आपली सेक्युलर मत जातील याची भीती होती. असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज विलेपार्ले येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहीले होते यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात ते म्हणाले, 'अभिनंदन समारोह हा एक बहाणा आहे. आचार्यजींचा आशीर्वाद घेणे या योग आहे. स्वामींनी सन्यास आश्रमाचे 50 वर्ष पूर्ण केले आहेत सनातन संस्कृतीत आपल्या धर्माचे महत्व मोठे आहे. काही लोक संकुचित वृत्तीने पाहतात. धर्माच्या मार्गावर चालणे ही संस्कृती आहे.' असही ते म्हणाले.

तसंच ज्यांना आपली परंपरा आणि संकृती माहिती नाही त्यांना हे कळलंच नाही की, सनातन संस्कृती काय आहे. ते आज आपण आपल्या संविधानाला त्याच रुपात पाहू शकतो. काहींना वाटत की इंग्रजानी जो इतिहास लिहिला तो योग्य आहे. पण इंग्रजांना आपल्यावर आक्रमण करायचे होते त्यामुळे त्यांनी तसा इतिहास लिहिला.

ते पुढे म्हणाले, आम्ही तो काळ पाहिला मोठ्या मोठ्या नेत्याना मंदिरात जायची लाज वाटत होती. कारण कुणी मंदिरात जाताना पाहिली तर आपली सेक्युलर मत जातील याची भीती होती. आज राहुल गांधी देखील मंदिरात जायला लागले, केजरीवाल हनुमान चालीसा म्हणू लागले ममता दीदी देखील जाऊ लागल्या आहेत. स्वतःला सुडो सेक्युलर म्हणणारे आता मंदिरात जाऊ लागले असल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply