भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली दिल्ली, जम्मू काश्मीरपर्यंत जाणवले हादरे; केंद्र अफगाणिस्तानात

दिल्लीच्या NCR मध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले आहेत. जम्मू काश्मीरपर्यंत हादरे बसले आहेत .तिथे वास्तव्य करणाऱ्या लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इती आहे. तर भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानातील हिंदूकुश भाग आहे. अद्याप या भूकंपाच्या धक्क्यामुळे जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या या तीव्र झटक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याआधीही दिल्लीतल्या NCR मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

दिल्ली एनसीआर भूकंपाच्या संवेदनशील भागात येतं. या भागात जर मोठा भूकंप झाला तर प्रचंड नुकसान आणि तेवढीच प्रचंड जिवीतहानीही होऊ शकते. हे नुकसान नेमकं किती असेलयाची कल्पना करणंही कठीण आहे. लोक आज झालेल्या घटनेमुळे दहशतीखाली आहेत.

याआधी ३१ डिसेंबरच्या रात्रीही याच भागात भूकंपाचे झटके बसले होते. १ जानेवारीला रात्री उशिरा मेघालय नोंगपोहमध्ये रिश्टर स्केलवर ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळीही दिल्ली हादरली होती.

भूकंप अभ्यासकांचं हे म्हणणं आहे आपल्या देशातला ५९ टक्के भाग हा भूकंप रिस्क झोनमध्ये येतो. देशातल्या पाचव्या झोनला सर्वात भयंकर आणि सक्रिय मानलं जातं. या झोनमध्ये येणाऱ्या राज्यांमध्ये भूकंपामुळे अतोनात नुकसान होऊ शकतं. हा पाचवा आणि सर्वात भयंकर झोन आहे जम्मू काश्मीरचा भाग, हिमाचल प्रदेशातला पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरामधलं कच्छचं रण, बिहारचा उत्तर भाग आणि भारताची पूर्वोत्तर राज्यं, त्याचप्रमाणे अंदमान आणि निकोबार ही बेटंही.

चौथ्या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीरचा उर्वरित भाग, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे उर्वरित भाग, हरियाणा, पंजाबचा काही भाग, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचा छोटा हिस्सा हे भाग येतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply