S. JaishankarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
भारत आणि अमेरिकेमध्ये मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली, त्यांनी भारतावरील टॅरिफ कमी केला. मात्र या ट्रेड डीलसोबतच भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची अतिरिक्त खरेदी करू नये, अशी अपेक्षा देखील अमेरिकेची आहे. हाच धागा पकडत जर्मनीमध्ये सुरू असलेल्या म्यूनिख सुरक्षा सम्मेलनामध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं. भारतानं अमेरिकेला असं आश्वासन दिलं आहे की, ते रशियाकडून अतिरिक्त तेलाची खरेदी करणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र याच व्यासपीठावर भारतानं अमेरिकेची पोलखोल केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना चांगलंच सुनावलं आहे. भारत धोरणात्मक स्वायत्ततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही आमच्या राष्ट्राच्या हितानुसार स्वतंत्रपणे निर्णय घेऊ असं जयशंकर यांनी मार्को रुबियो यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
रुबियो यांनी काय केला आहे दावा?
अमेरिकेनं रशियावर घातलेल्या प्रतिबंधांबाबत बोलताना रुबियो यांनी भारताबाबत मोठा दावा केला आहे. भारतानं अमेरिकेला असं आश्वासन दिलं आहे की, ते आता रशियाकडून अतिरिक्त कच्च तेल खरेदी करणार नाही, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ असा होतो की सध्या भारतानं वर्तमान स्थितीमध्ये रशियाला जी कच्च्या तेलाची ऑर्डर दिली आहे, ती प्रभावीत होणार नाहीये. मात्र यावर अद्याप भारताकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. परंतु रॉयर्टसच्या एका रिपोर्टनुसार भारतानं रशियाकडून तेल खरेदीचं प्रमाण काही अंशी कमी केलं आहे.
जय शंकर काय म्हणाले?
जयशंकर यांनी या सुरक्षा सम्मेलनामध्ये बोलताना म्हटलं आहे की, भारत धोरणात्मक स्वायत्ततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही आमच्या राष्ट्राच्या हितानुसार स्वयंत्रपणे निर्णय घेऊ, आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचं हे ऊर्जेची गरज, लागणारा खर्च, जोखीम आणि सहज उपलब्धता या गोष्टी विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल. भारतामधील तेल कंपन्या याबाबत निर्णय घेतील. मला असं वाटतं युरोपियन देश आणि जगातील इतर देश देखील ऊर्जेची उपलब्धता, खर्च, जोखीम या सर्व गोष्टी विचारात घेऊन कच्चे तेल खरेदीचा निर्णय घेतात, त्याचप्रमाणे भारत देखील पूर्णपणे आपल्या राष्ट्रहिताचा निर्णय केंद्रस्थानी ठेवूनच याबाबत निर्णय घेईल.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


