“भारतात अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष असं समजण्याची चूक आपण करतो, जर…”; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद

शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे गटाचा हक्क आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाचा यासंदर्भातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे दुपारी १२ च्या सुमारात सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाची बाजू हरिश साळवे मांडत असून आजच्या सुनावणीदरम्यान सुरुवातीला उद्धव ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपील सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. सुनावणी सुरु असताना न्यायालयाने उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर शिंदे गटाने अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.

बहुमत गमावलेल्या नेत्यांसाठी पक्षांतरबंदी कायदा शस्त्र ठरु शकत नाही असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने हरिश साळवे यांनी केला. याचसंदर्भात पुढे साळवे यांनी, “भारतामध्ये आपण अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष समजण्याची चूक करतो. जर पक्षातील काही लोकांना मुख्यमंत्री बदलावा असं वाटत असेल तर ही गोष्ट पक्षविरोधी ठरत नाही. हा पक्षांतर्गत मुद्दा आहे,” असा युक्तिवाद केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply