भाईंदर : प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व; सभापतीपदी शिवसेनेच्या अनिता पाटील

भाईंदर : मिरा-भाईंदर पालिकेच्या  प्रभाग समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये झालेली बंडाळी वरिष्ठ पातळीवर शमवण्यात आल्यामुळे सहापैकी पाच प्रभाग समित्यांवर भाजपचे उमेदवार विजयी  झाले आणि एका प्रभाग समितीमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेची नगरसेविका सभापतीपदी विराजमान झाली. महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत तीन प्रभाग समित्यांमध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली होती, तर एका प्रभाग समितीमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या नगरसेविकेने भाजपच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली होती. भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीवर वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आल्यामुळे पाच प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे उमेदवार सभापतिपदी निवडून आले.

यात दोन प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष रवी व्यास गटाचे आणि तीन प्रभाग समित्यांमध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता गटाचे सभापती निवडले गेले. प्रभाग समिती सहामध्ये शिवसेनेच्या अनिता पाटील या भाजपच्या पाठिंब्याने विजयी झाल्या. अनिता पाटील या मेहता गटाच्या मानल्या जातात. त्यामुळे सहा प्रभाग समित्यांवर सत्ताधारी भाजपचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *