बुस्टर डोसमधील अंतर कमी करा; अदर पुनावालांची केंद्राला विनंती

पुणे : जगासह देशभरात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा तिसरा डोस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. या सर्वामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याची विनंती केंद्राकडे केली असून, दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नऊ महिन्यांऐवजी सहा महिन्यांवर करण्याचे आवाहन त्यांनी केंद्राला केले आहे.

पुनावाला म्हणाले की, सध्या तिसरा डोस घेणाऱ्यांची संख्या थोडी धिम्या गतीने सुरू आहे.याचे मुख्य कारण म्हणजे केंद्राकडून तिसऱ्या डोससाठी लावण्यात आलेला नियम आहे. कोरोना लसीचा तिसरा डोस घेणाऱ्या व्यक्तीने दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच कोरोनाचा तिसरा डोस घेता येत आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचा तिसरा डोस घेणाऱ्यांची गती धिम्या गतीने सुरू आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील नऊ महिन्याचे अंतर हीच यामागची मुख्य अडचण आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नऊ महिन्यांऐवजी सहा महिन्यांवर कमी करण्याचे आवाहन आपण केले असल्याचे पुनावाला यांनी सांगितले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply