रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल चोरल्याच्या आरोपाखाली मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी एका मराठी अभिनेत्याला अटक केली आहे. आरोप 32 वर्षांचा असून तो रील स्टार आणि मराठी टीव्ही अभिनेता असल्याचं समजतंय. त्याच्याकडून पोलिसांनी पाच रॉयल एनफिल्ड मोटरसायकल जप्त केल्या आहेत. सुनील उर्फ रेहान सुभाष चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याचा रहिवासी आहे. सध्या तो पत्नीसोबत बदलापूर पूर्व इथे राहतो.
सोशल मीडियावर रील्स क्रिएटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेहानने अनेक मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही केल्या आहेत. ही घटना 21 जानेवारी रोजी समोर आली, जेव्हा कुर्ला पश्चिम इथले रहिवासी संदीप ओमप्रकाश सोनकर यांनी टिळकनगर रेल्वे स्टेशनजवळील एल. आर. उड्डाणपूल परिसरातून आपली बुलेट मोटरसायकल चोरी झाल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर टिळक नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे आणि पोलीस निरीक्षक संगम गुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पाळत ठेवून पोलिसांनी आरोपीला बदलापूर पूर्व इथून अटक केली.
आरोपीवर मुंबईत जवळपास 17 मोटरसायकल चोरीचे गुन्हे नोंद असल्याचीही धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. रेहानला पकडण्यासाठी पोलिसांनी बदलापूरमध्ये सापळा रचला होता. सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं. नंतर चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी वेगवेगळ्या गुन्ह्यातील पाच रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून आरोपी रेहान या बुलेट मोटरसायकल चोरी करून त्या विविध शहरांमध्ये विकत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. सोशल मीडियावर रील्स पोस्ट करून त्याने आपला चाहतावर्ग निर्माण केला होता. तर दुसरीकडे अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली, जेणेकरून कोणाला त्याच्यावर संशय येऊ नये.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


