बारामती : IPS कृष्ण प्रकाश यांनी घेतली शरद पवारांची भेट

बारामती : नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

आज सकाळीच कृष्णप्रकाश अचानकच गोविंदबाग येथे आले. त्यांनी पवार यांच्याशी दहा ते बारा मिनिटे संवाद साधला आणि तेथून ते निघून गेले. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी देण्यास नकार दिला. ही खाजगी भेट होती इतकेच त्यांनी या भेटीबाबत सांगितले.

दुसरीकडे कृष्णप्रकाश यांना थांगपत्ता न लागू देता बदली केली गेल्याचीही जोरदार चर्चा आहे, कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते, असेही बोलले जात आहे. दरम्यान बदलीनंतर त्यांनी पवार यांच्याशी संवाद साधत आज चर्चा केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply