बारामतीकर युवकाची अशीही कामगिरी; 'इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद

बारामती : मोटारसायकलवर कसरती करण्यापासून आपल्याकडे युवकांना रोखले जाते, मात्र एका बारामतीकर युवकाने दुचाकीच्या बाबतीत एका वेगळ्या क्षेत्रात आपले करिअर केले आहे. बारामतीतील रोहित दिलीप शिंदे असे या युवकाचे नाव असून त्याने नुकतेच सुर्यनमस्कार दिनानिमित्त चक्क दुचाकीवर साडेचार मिनिटात दहा सुर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला आहे. त्याची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.

चालु दुचाकीवर दहा वेळा सुर्यनमस्कार करणारा जगातील पहिला ‘मोटार सायकल रायडर’ ठरला आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून दुचाकी शर्यत करीत असलेल्या रोहितने आतापर्यंत देशात तीनशेहून अधिक शोमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्याने अनेक युवकांना मोटार सायकल रायडींगचे प्रशिक्षण सुरू केले आहे.

झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवित चेन्नई येथे होणाºया ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पर्धेत त्याने प्रवेश प्राप्त केला आहे. यात प्रथम दहामध्ये येणा-यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

मोटार सायकल रायडींगमध्ये रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला होता, हैद्राबाद मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. सीआरएफ कंपनीने स्टंट वॉलफेअर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती .यामध्ये फ्री स्टाईल स्टंट रायडींग, आॅबस्टूकल टाइम चॅलेंज व लास्ट मॅन स्टँडींग या तिन्ही स्पर्धामध्ये रोहितने अव्वलस्थान पटकाविले होते.

मोटारसायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची स्पर्धा होती. केवळ आठ मिनिटे 28 सेकंदात पूर्ण करीत त्याने विक्रम नोंदविला. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट रायडिंगमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply