बाप- मुलीच्या जोडीने भारतीय वायू सेनेत रचला इतिहास, एकाच फायटर प्लेनमधून यशस्वी उड्डाण

बाप आणि मुलीच्या जोडीने भारतीय वायू सेनेत इतिहास रचला आहे. फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा ही आपल्या फायटर पायलट वडिलांसोबत विमान उडवणारी पहिली महिला भारतीय वैमानिक बनली आहे. अनन्याने हॉक-132 या विशेष विमानाने 30 मे रोजी उड्डाण केले होते.

अनन्याने तिचे वडील एअर कमोडोर संजय शर्मा यांच्यासोबत हॉक 132 एअरक्राफ्टमध्ये एअर फोर्स स्टेशन बिदर येथून उड्डाण केले. डिसेंबर 2021 मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्त झालेली अनन्या शर्मा हीने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केल्यानंतर पायलट म्हणून भारतीय हवाई दलात प्रवेश केला.

अनन्याला लहानपणापासूनच फायटर पायलट बनायचे होते. अनन्याचे वडील एअर कमोडोर संजय शर्मा 1989 मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनले आणि मिग-21 स्क्वाड्रनचे कमांडिंग करण्याचा मान त्यांना मिळाला होता.

भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील पहिली पिता मुलगी ‘फायटर पायलट’ जोडी आहे. भारतीय हवाई दलात यापूर्वी कधीही वडील आणि मुलीने एकाच लढाऊ फॉर्मेशनमध्ये एकत्र विमान उडवलेले नाही. एअर कमोडोर संजय शर्मा यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत असल्याचे ते सांगतात. अनन्याचे बिदर येथे सुरू असलेले प्रशिक्षण लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर ती आणखी मोठ्या लढाऊ विमानांवर उड्डाण करण्यास सक्षम होईल, असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply